
पेगी मोहन यांचं 'वाँडरर्ज, किंग्ज, ॲंड मर्चंट्स - दी स्टोरी ऑफ इंडिया थ्रू इट्स लँग्वेजेस' हे अलीकडच्या काळातलं एक महत्त्वाचं पुस्तक. भाषाविज्ञान आणि सामाजिक-सांस्कृतिक इतिहास यांचा मिलाफ साधत भारतीय भाषांचा इतिहास उलगडत नेणारं हे पुस्तक जितकं संशोधकीय शिस्तीतलं आहे, तितकंच ते एखाद्या रहस्यकथेसारखं उत्कंठावर्धक आहे. खास भारतीय पद्धतीनं भाषांची वैशिष्ट्यं उलगडणारं आहे, आणि भारताच्या वैविध्यपूर्ण इतिहासाची ग्वाही देणारंही आहे. त्याचं भाषांतर मनोविकास प्रकाशानातर्फे प्रकाशित होतंय. त्याबद्दल भाषावैज्ञानिक चिन्मय धारूरकर यांच्याशी जितेंद्र वैद्य आणि मेघना भुस्कुटे यांनी केलेल्या गप्पा. सहभाग : चिन्मय धारूरकर, मेघना भुस्कुटे, जितेंद्र वैद्य.