आजपासून साधारण दोन हजार वर्षांपूर्वी भारताच्या दक्षिणेला महिलारोप्य नावाचं नगर होतं. जिथे अमरशक्ती नावाचा राजा राज्य करत होता. अमरशक्तीला तीन मुलं होते. बहुशक्ती, उग्रशक्ती आणि अनंतशक्ती. राजा अमरशक्ती नीतीशास्त्रात जितका निपुण होता तेवढेच त्याचे पुत्र महामूर्ख होते. लेखन-वाचनात त्यांचं मन अजिबात रमत नसे. आणि याची अमरशक्ती राजाला खूपच चिंता होती. एके दिवशी त्याने हीच चिंता आपल्या समस्त मंत्रीमंडळासमोर मंडळी आणि त्यांच्याकडे या विषयी सल्ला मागितला. राजा आपल्या मंत्र्यांना म्हणाला, "माझे पुत्र अजिबातच लेखन-वाचनात लक्ष देत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना शास्त्रांचं जराही ज्ञान नाहीये. यांना असं पाहिल्यावर मला त्यांच्याबरोबर आपल्या राज्याचीही चिंता लागून राहिली आहे. तुम्ही लोक कृपा करून या समस्येवर काही उपाय सांग."
सभेत उपस्थित एक मंत्री म्हणाला, "राजा! पहिल्या बारा वर्षांपर्यंत व्याकरण शिकायचं असतं. त्या नंतर मनूच्या धर्मशास्त्राचा, चाणक्यच्या अर्थशास्त्राचा आणि नंतर वात्सायनच्या कामशास्त्राचा अभ्यास केला जातो. त्यानंतर ज्ञान प्राप्ती होते." मंत्र्याचं म्हणणं ऐकून राजा म्हणाला, "मानवाचं जीवन खूपच अनिश्चित आहे आणि अशा प्रकारे सगळी शस्त्र अभ्यासण्यात, वर्ष निघून जातील. हे सारं ज्ञान प्राप्त करण्याचा काही दुसरा उपाय सांगा." तेव्हा सभेत उपस्थित सुमित नावाचा मंत्री म्हणाला, "इथे समस्त शास्त्रांतील विद्वान आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रिय असलेले विष्णुशर्मा नावाचे आचार्य राहतात. तुम्ही तुमचे पुत्र त्यांच्या ताब्यात द्या. ते अवश्य तुमच्या पुत्रांना कमी कलावधीत समस्त शास्त्रांचं ज्ञान प्रदान करतील."
सुमतीचं हे बोलणं ऐकून राजाने त्वरित विष्णुशर्माला आपल्या सभेत बोलावलं आणि सांगितलं, "आचार्य! तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या या पुत्रांना लवकरात लवकर नीतीशास्त्राचं ज्ञान प्रदान करा. जर तुम्ही असं केलं, तर मी तुम्हाला शंभर गावं पुरस्कार म्हणून भेट देईन." राजाचं बोलणं ऐकून विष्णुशर्मा म्हणाले, "राजन माझ्यासारख्या ब्राह्मणाला शंभर गावांचा काय लोभ, मला तुमचा पुरस्कार नको. मी तुमच्या पुत्रांना जरूर ज्ञान प्रदान करेन आणि पुढील सहा महिन्यांत त्यांना नीती शास्त्रात निपुण बनवेन. जर मी असं करू शकलो नाही, तर तुम्ही मला जरूर दंडित करू शकता." विष्णुशर्माची ही प्रतिज्ञा ऐकून समस्त मंत्रीगण आणि राजा खूप खुश झाला आणि तिन्ही राजपुत्रांना त्यांच्या स्वाधीन करून निश्चिंत होऊन राज्य कारभारत व्यग्र झाला.
विष्णुशर्मा तिन्ही राजकुमारांना आपल्या आश्रमात घेऊन आला आणि पशूपक्षांच्या काहण्यांद्वारे त्यांना शिक्षण देऊ लागला. विष्णुशर्माने या कहाण्यांना पाच भागात विभागलं ते अशा असे, पहिला भाग मित्रभेद : अर्थात मित्रांमधील वाद भांडणे, एकमेकांपसून लांब जाणे, दुसारा भाग मित्रसंप्राप्ती म्हणजे मित्र प्राप्ती आणि त्याचे लाभ, तिसरा भाग काकोलूकीया म्हणजे कावळा आणि घुबडाच्या कथा. चौथाभाग लब्धप्रणाश म्हणजे जिवावर बेतलं, तर काय करायचं आणि पाचवा भाग अपरीक्षितकारक अर्थात ज्या विषयातली माहिती नसले घाईगडबडीने त्यातपावले उचलू नयेत. याच नैतिक काहाण्यांद्वारे विष्णुशर्माने तिन्ही राजकुमारांना सहा महिन्यातच नीतीशास्त्रात विद्वान बनवलं.
मनोविज्ञान, व्यावहारिक दृष्टीकोण आणि राज्यकारभाराची शिकवण देणार्य काहण्यांच्या संकलनाला पंचतंत्र म्हटलं जातं आणि याच कहाण्याच्या माध्यमातून मुलांना रंजक पद्धतीने ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या जाऊ शकतात. सूत्रधारच्या या पर्वात आम्ही मुलांना विचारात घेत पंचतंत्राच्या या कहाण्या सादर करत आहोत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.sutradhar
All content for पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti is the property of Sutradhar and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.

कोण्या एका जंगलात अनेक जलचरांनी भरलेला एक तलाव होता. तिथे राहणारा एक बगळा म्हातारा झाल्यामुळे त्याला आजकाल मासे पकडता येत नसत. भुकेने व्याकूळ झाल्यामुळे तो नदीकाठी बसून आसवं गाळत रडत बसला होता. त्याच वेळी त्याला एका खेकड्याने रडताना पाहिलं आणि कुतूहल आणि सहानभूती पोटी विचारलं, "मामा! आज तुम्ही तुमच्या भोजनाचा शोध घेण्याचं सोडून इथे रडत का बसला आहात?"
बगळा म्हणाला, "खरंय तुझं. मासे खाऊन मला आता वैराग्य आलं आहे. आता मी आमरण उपोषण सुरू केलं आहे."
खेकड्याने विचारलं, "काय हो मामा पण तुमच्या या वैराग्याचं नेमकं कारण काय?"
बगळा म्हणाला, " अरे याच तळ्यातला माझा जन्म आणि इथेच मी म्हातारा झालो. पण आजच मी ऐकलंय की पुढच्या बारा वर्षात पाऊसच पडणार नाहीये. त्यामुळे आता हा तलाव आटून जाईल आणि इथे राहणार्या सर्व प्राण्यांवर मृत्यूचे संकट ओढवणार आहे. म्हणूनच मी दुःखी आहे."
खेकड्याने सगळ्या जलचरांना ही बातमी सांगितली. भीतीने घाबरगुंडी उडलेले ते सगळे बगळ्यापाशी आले आणि एका स्वरात म्हणाले, "मामा आमचा जीव वाचवण्याचा काही उपाय आहे का?" बगळा म्हणला, "या तलावापासून काही अंतरावर एक खूप मोठा तलाव आहे. त्यात इतकं पाणी आहे, की बारा वर्षच काय चौवीस वर्ष जरी पाऊस पडला नाही तरी त्यातलं पाणी अटणार नाही. जर तुमची इच्छा असेल तर एकेक करून मी तुम्हा सगळ्यांना त्या तलावात नेऊन सोडेन."
अशा प्रकारे बगळा रोज काही मासे तलावातून घेऊन जात असे आणि त्यांना एका खडकावर नेऊन फस्त करत असे. असं अनेक दिवस चाललं आणि धूर्त बगळ्याला विना कष्ट भरपेट भोजन मिळत राहिलं.
एके दिवशी न राहून खेकडा बगळ्याला म्हणाला, "मामा तुमच्याशी सगळ्यात पहिल्यांदा तर मी बोललो होतो आणि अजून पर्यंत तुम्ही मलाच त्या तळ्यात सोडलं नाही. तुम्ही कृपा करून माझ्याही प्राणांचं रक्षण करा."
दुष्ट बगळ्याने विचार केला, "रोज रोज मासे खाऊन मलाही आता कंटाळा आलाय. आज या खेकड्यालाच खाऊन टाकतो. असा मनात विचार करून त्याने त्या खेकड्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि खडकाच्या दिशेने तो उडू लागला.
खेकड्याला दूरवरून माशांच्या हाडाचा ढीग दिसला. तो पाहून तो घाबरला आणि बगळ्याला म्हणाला, "मामा तो दूसरा तलाव किती लांब आहे? मला एवढावेळ तुमच्या पाठीवर बसवून तुम्ही आता दमला असाल नं!"
बगळ्याने विचार केला, "पाण्यात राहणारा हा खेकडा हा माझं काय वाकडं करणार!" आणि म्हणाला, "अरे खेकड्या दूसरा तलाव वगैरे काही नाहीये. इथे मी माझ्या भोजनाची सोय लावून घेतली आहे आणि आजचं माझं भोजन आहेस तू!"
बगळ्याचं हे बोलणं ऐकताक्षणी खेकड्याने आपल्या नांग्यामध्ये त्याची मान आवळली आणि त्यामुळे तो दुष्ट बगळा मरण पावला.
बगळा मेल्यावर खेकडा हळूहळू तलावापाशी आला आणि इतरांना त्याने त्या धूर्त बगळयाच्या कावेबाजपणाविषयी सांगून टाकलं.
म्हणूनच म्हणतात, कधीही चंचलवृतीने गरजे पेक्षा अधिक बडबड करू नये.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
पंचतंत्रातील गोष्टी Panchatantratil Ghoshti