Home
Categories
EXPLORE
Music
True Crime
Comedy
Society & Culture
Education
Technology
History
About Us
Contact Us
Copyright
© 2024 PodJoint
00:00 / 00:00
Sign in

or

Don't have an account?
Sign up
Forgot password
https://is1-ssl.mzstatic.com/image/thumb/Podcasts114/v4/6b/59/2b/6b592b34-33a8-ac83-38b3-cf0200ee2815/mza_320640697607962720.jpg/600x600bb.jpg
Spreading Happiness
Pankaj Kulkarni
15 episodes
1 week ago
Spreading Happiness is all about making people happy , Providing a Platform to Make People More Happy More Healthy ,More Wealthy . Spreading Happiness with others is the only key to Earn More Happiness for yourself .
Show more...
Health & Fitness
RSS
All content for Spreading Happiness is the property of Pankaj Kulkarni and is served directly from their servers with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
Spreading Happiness is all about making people happy , Providing a Platform to Make People More Happy More Healthy ,More Wealthy . Spreading Happiness with others is the only key to Earn More Happiness for yourself .
Show more...
Health & Fitness
https://d3t3ozftmdmh3i.cloudfront.net/production/podcast_uploaded/5597545/5597545-1616949486838-77717bcfb4155.jpg
*तिचे थांबणे ....* Tiche Thambane 1
Spreading Happiness
3 minutes 21 seconds
4 years ago
*तिचे थांबणे ....* Tiche Thambane 1
*तिचे थांबणे ....* *असं म्हणतात, की वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही...पण वेळेचं गणित साधणाऱ्या 'ती' ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात ! --उदाहरणार्थ साध्या-साध्या गोष्टी--* *पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद ..*. *पण 'ती' तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत. कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही...* *कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते... तरीही* *सगळी कामे आटोपल्यावरही,ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून , वाया जाऊ नये म्हणून.* *तशीच,* *जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , 'ती' थांबते.* *शी-शु सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, कधी सोबतीला.... बाथरूमच्या दारापाशी ती थांबून असते.* *मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत 'ती' थांबते.* *मुलं लहान असो नाहींतर मोठी...परीक्षा, पालक-सभा, त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं....सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.* *चहा-कॉफीचा एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते* *तेवढ्याच चार निवांत गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण , शेअर* *करण्यासाठी.* *घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत... कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत... 'ती' थांबते, जेवायची.* *सगळ्यांच्या पाठीशी 'ती', थांबते.* *खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय....व्यवस्थित.* *काय हरकत आहे हे मान्य करायला...* *तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे* ..*.त्या ऊर्जेमुळेच वेळ चांगली चालली आहे.* *गेले जवळजवळ तेरा महिने महाकठीण प्रसंगाला सगळं जग तोंड देतंय,* *पण इथे वेळ भराभर निघून जातेय.* *अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी 'थांबून' आहे ....अगदी स्ट्रॉंग...* *एकही दिवस kitchen बंद नाहीये,* *कंटाळा येतो, थकवा ही...तरीही* *रोजच्या-रोज सगळी स्वछता,* *extra काळजी,* *कोणत्याही आजारपणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलंय.* *म्हणूनच म्हंटल, तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे...त्या उर्जे मुळेच ही अशी कठीण वेळ ही निघून जाईल...!!!* *प्रत्येक घरातील 'तिला' सादर नमन.*
Spreading Happiness
Spreading Happiness is all about making people happy , Providing a Platform to Make People More Happy More Healthy ,More Wealthy . Spreading Happiness with others is the only key to Earn More Happiness for yourself .