
एकादशाध्यायीं कथन | भास्करासी डसला श्वान |
आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन | गोपाळदासा भेटले ||
झ्यामसिंगाच्या विनंतीसी | देऊन मान अडगांवासी |
येते झाले पुण्यराशी | श्रीगजाननमहाराज ||
निजधामा भास्कर गेला | त्याचा देह ठेविला |
द्वारकेश्वरासन्निध भला | सतीबाईचे शेजारीं ||
आज्ञा केली कावळ्यांला | तुम्ही न यावें या स्थला |
वांचविले गणु जवर्याला | सुरुंग उडतां विहिरींत ||