जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया ।अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया । जयदेव जयदेव ॥धृ॥ निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी । स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।तें तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी । लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥ होऊ न देशी त्याची जाणिव तू कवणा । करूनि ‘गणि गण गणात बोते’ या भजना ।धाता हरिहर गुरूवर तूची सुखसदना । जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥ लीला अनंत केल्या बंकटसदनास । पेटविले त्या अग्नीवाचुनि चिलमेस ।क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥ व्याधी वारून केले कैकां संपन्न । करविले भक्तालागी विट्ठलदर्शन ।भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ॥४॥
या ग्रंथाची अवतरणिका | देतों आतां ही तुम्ही ऐका |
वेळ उगा दवडूं नका | पूर्ण व्हावें सावधान ||
या ग्रंथाची अवतरणिका | देतों आतां ही तुम्ही ऐका |
वेळ उगा दवडूं नका | पूर्ण व्हावें सावधान ||
विसाव्यामाजीं इतर | श्रींची समाधि झाल्यावर |
जे का घडले चमत्कार | त्यांचें वर्णन केलें असे ||
जे जे भाविक भक्त कोणी | त्यांना त्यांना अजुनी |
दर्शन देती कैवल्यदानी | त्यांच्या इच्छा पुरवून ||
कथा एकोणविसाव्यासी | दिला काशीनाथपंतासी | आशीर्वाद तो अतिहर्षी | तो येता दर्शना || गोपाळ मुकिंद बुटी भला | नागपुरासी घेऊन गेला | श्रीगजाननस्वामीला | आपुल्या गेहाकारणें || त्याच्या मनीं ऐसा हेत | महाराज ठेवावें नागपुरांत | परी हरि पाटलांनीं परत | आणिले समर्थ शेगांवीं || धार-कल्याणचे रंगनाथ | साधु आले भेटण्याप्रत | समर्थासी शेगांवांत | ऐसे आणि कितीतरी || श्रीवासुदेवानंद सरस्वती | जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति | दृष्टादृष्ट होतां नुसती | आनंद झाला उभयतातें || तेव्हां बाळाभाऊला | जो कां होता संशय आला | तो समर्थांनीं निवटिला | करुनियां उपदेश|| केलें खळ्याचें संरक्षण | गाढवाचे पासून | समर्था मारितां आलें मरण | नारायणासी बाळापुरीं || गजाननाचे कृपें भलें | जाखडयाचें लग्न झालें | कपीलधारेसी दिधलें | दर्शन निमोणकराला || तुकारामें आपुला | पुत्र समर्था वाहिला | नारायण नामें भला | सेवा करावयाकारणें || पंढरीतें जाऊन | विठ्ठलातें विचारुन | महाराज आले परतून | शेगांवाकारणें || पुढें भाद्रपदमासासी | ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं | आधुनिक कालाचा हा ऋषि | समाधिस्त जहाला ||
कथा बायजा माळणीची | अठराव्यामाजीं साची |
कवर डाँक्टरच्या फोडाची | कथा यांत ग्रथित असे ||
महाराज गेले पंढरीला | घेऊन अवघ्यां लोकांला |
तेथें बापुना काळ्याला | दर्शन हरीचें करविलें ||
कवठे बहादुरचा वारकरी | मरीनें झाला आजारी |
त्यास घटकेमाझारीं | समर्थानें बरें केलें ||
एक्या कर्मठ ब्राह्मणाला | श्वान उठून मेलेला |
दाऊन त्याचा गलित केला | कर्माभिमान श्रोते हो ||
सतराव्यांत कथा सुरस | विष्णूसाच्या घरास |
जाया मलकापुरास | समर्थ निघाले गाडींतून ||
नग्न फिरती म्हणूनी | खटला भरला पोलिसांनीं |
केवळ अहंपणानीं | सत्पुरुषासी त्रास द्याया ||
महताबशा सांईला | पाठवून दिलें पंजाबाला |
हिंदुयवनांविषयीं केला | कळकळीचा बोध त्यासी ||
बापुरावाच्या कांतेसी | भानामती न मानी साची |
भेट गंगाभागीरथीसी | झाली अकोटीं विहिरींत ||
कथा ऐशा सोळाव्यासी | पुंडलीक अंजनगांवासी|
जातां निवारिले त्यासी | येऊनिया स्वप्नांत ||
पादुकाचा प्रसाद त्याला | झ्यामसिंगहस्तें पाठविला |
कवराच्या भाजीभाकरीला | ग्रहण केलें आनंदें ||
छरा तुकारामाचा | कानामधून पडला साचा |
ह्या अशा कथांचा | समावेश सोळाव्यांत ||
अध्याय तो पंधरावा | शिवजयंतीचा आहे बरवा |
आले अकोले नामक गांवा | टिळक बाळ गंगाधर ||
भाकरी प्रसाद पाठविला | कोल्हटकराचे हस्तें भला |
मुंबईंत लोकमान्याला | ग्रहण करायाकारणें ||
श्रीधर गोविंद काळ्यास | करिते झाले उपदेश |
नको जाऊं विलायतेस | येथेंच आहे सर्व कांहीं ||
नर्मदेच्या स्नानास | सोमवती अमावास्यास | नौका फुटतां छिद्रास | हात लाविला नर्मदेनीं ||विडा माधवनाथाला | शिष्याहातीं पाठविला | या कथा चवदाव्याला | वर्णिल्या असती साकल्यें ||
कथाभाग तेराव्याचा | महारोग गोसाव्याचा |
हरण गंगाभारतीचा | केला असें गजाननें ||
बंडुतात्यासी भाग्य आलें | भूमींत धन सांपडलें |
कर्जापासून मुक्त केलें | समर्थानें निजकृपें ||
शेठ बच्चूलालाची | कथा द्वादशाध्यायीं साची |
मूर्ति निरिच्छपणाची | प्रत्यक्ष होते महाराज ||
स्वामीचें वस्त्र नेसला | पितांबर शिंपी कोंडोलीला |
स्वइच्छेनें येता झाला | परमभक्त होता जो ||
पितांबरानें कोंडोलीसी | बळिरामाच्या शेतासी |
वठलेलिया आंब्यासी | पानें फळें आणविलीं ||
पितांबर राहिला कोंडोलींत | तेथेंच झाला समाधिस्थ |
नवा मठ झाला स्थापित | शेगांवीं समर्थ इच्छेनें ||
विचार करुनी मानसीं | बसून रेतीच्या गाडीसी |
महाराज नव्या मठासी | आले जुन्या मठांतून ||
झ्यामसिंगानें मुंडगांवाला | नेलें गजाननस्वामीला |
पर्जन्यानें घोटाळा | भंडार्याचा केला असे ||
झ्यामसिंगानें आपुली | इस्टेट समर्था अर्पिली |
पुंडलिकाची निमाली | गांठ प्लेगची श्रीकृपें ||
एकादशाध्यायीं कथन | भास्करासी डसला श्वान |
आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन | गोपाळदासा भेटले ||
झ्यामसिंगाच्या विनंतीसी | देऊन मान अडगांवासी |
येते झाले पुण्यराशी | श्रीगजाननमहाराज ||
निजधामा भास्कर गेला | त्याचा देह ठेविला |
द्वारकेश्वरासन्निध भला | सतीबाईचे शेजारीं ||
आज्ञा केली कावळ्यांला | तुम्ही न यावें या स्थला |
वांचविले गणु जवर्याला | सुरुंग उडतां विहिरींत ||
दशमाध्यायीं सुरेख | उमरावतीचें कथानक |
उपरति झाली पुरी देख | तेथें बाळाभाऊला ||
गणेश आप्पा चंद्राबाई | यांनीं अर्पिला संसार पाईं |
भावभक्तीनें लवलाही | गजाननस्वामीच्या ||
गणेश दादा खापडर्याला | शुभ आशीर्वाद दिधला |
छत्रीनें मारुन बाळाला | परीक्षा त्याची घेतली ||
द्वाड गाय सुकलालाची | अति गरीब केली साची |
दांभिक भक्ति घुडयाची | कशी ती कथन केली ||
कथा नवमाध्यायाला| द्वाड घोडा शांत केला |
खूण नवस करणाराला | दिली असे गांजाची ||
दासनवमीचे उत्सवासी | समर्थ बाळापुरासी |
घेऊन आपल्या शिष्यांसी | बाळकृष्णाच्या घरां गेले ||
बाळकृष्णालागून | करविलें समर्थाचें दर्शन |
संशयरहित केलें मन | तया रामदास्याचें ||
दशमाध्यायीं सुरेख | उमरावतीचें कथानक |
उपरति झाली पुरी देख | तेथें बाळाभाऊला ||
गणेश आप्पा चंद्राबाई | यांनीं अर्पिला संसार पाईं |
भावभक्तीनें लवलाही | जाननस्वामीच्या ||
गणेश दादा खापडर्याला | शुभ आशीर्वाद दिधला |
छत्रीनें मारुन बाळाला | परीक्षा त्याची घेतली ||
द्वाड गाय सुकलालाची | अति गरीब केली साची |
दांभिक भक्ति घुडयाची | कशी ती कथन केली ||
कथा आहे अष्टमांत | दुफळी पाटील देशमुखांत |
अर्ज दिधला सरकारांत | महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ||
खंडूवरी बालंट आलें | तें समर्थांनीं नासिलें |
निर्दोष सुटते झाले | खंडू पाटील खटल्यांतून ||
तेलंगी ब्राह्मणाला | वेद म्हणून दाखविला |
आपण कोण हा कळविला | सहज लीलेनें समाचार ||
कृष्णाजीच्या मळ्याशीं | महाराज राहिले छपरासी |
मंदिराच्या सान्निध्यासी | चंद्रमौळी हराच्या ||
ब्रह्मगिरी गोसाव्याला | अभिमानविरहित केला |
"नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला | रहस्यासह सांगून ||
जळत्या पलंगाच्यावर | महाराज बसते झाले स्थिर |
न जाळे वैश्वानर | केव्हांही खर्या संताला ||
गांवींची पाटीलमंडळी | अवघी आडदांड होती भली |
हमेशा होई बोलाचाली | त्यांची समर्थाबरोबर ||
हरि पाटलासवें भले | महाराज कुस्ती खेळले |
मल्लविद्येचें दाविलें | प्रत्यंतर बहुताला ||
उंसाचा चमत्कार | दाऊनियां साचार |
अभिमानाचा परिहार | केला पाटील मंडळींच्या ||
भिक्यानामें दिला सुत | खंडू कडताजी पाटलाप्रत |
आम्रभोजनाचें व्रत | चालविण्यास कथिलें पाटलाला ||
ऐशा कथा सप्तमाध्यायीं | कथन केल्या आहेत पाही |
निष्ठा समर्थांच्या ठायीं | जडली पाटीलमंडळींची ||
षष्ठाध्यायीं ऐसी कथा | बंकटलालें सद्गुरुनाथा |
मक्याचीं कणसें खाण्याकरितां | नेलें आपुल्या मळ्यांत ||
गांधीलमाशा उठल्या तेथ | लोक होऊन भयभीत |
पळूं लागले असती सत्य | जीव आपुला घेऊनी ||
बाधा गांधीलमाश्यांची | महाराजा न झाली साची |
घेतली असे शिष्यत्वाची | परीक्षा बंकटलालाची ||
नरसिंगजीस भेटण्याला | स्वामी गेले अकोटाला |
जो नरसिंगजी होता भला | शिष्य कोतशा अल्लीचा ||
कांहीं दिवस राहिले | अकोटामाजीं भले |
नरसिंगजीसी हितगुज केलें | बंधु आपुला म्हणून ||
चंद्रभागेच्या तीरीं | शिवरग्रामाभीतरीं |
कृपा व्रजभूषणावरी | केली असें जाऊन ||
मारुतीच्या मंदिरांत | श्रावणमासाच्या उत्सवांत |
समर्थ आले राहण्याप्रत | येथें षष्ठमाची पूर्तता ||
कथा पंचमाध्यायांत | महाराज पिंपळगांवांत |
बसले शंकराच्या मंदिरांत | पद्मासन घालोनियां ||
गुराख्यांनीं पूजा केली | गांवची मंडळी तेथें आली |
महाराजांसी घेऊन गेली | पिंपळगांवाकारणें ||
हें कळलें बंकटलाला | तो पिंपळगांवास गेला |
महाराजासी आणण्याला | परत शेगांवाकारणें ||
समर्थासी आणले परत | कांहीं दिवस राहून तेथ |
पुन्हां गेले अकोलींत | भास्करासी तारावया ||
कोरडया ठणठणीत विहिरीला | जिवंत झरा फोडीला |
एका क्षणांत आणिलें जला | त्या कोरडया विहिरी ठायीं ||
भास्कराची उडवलि भ्रांती | घेऊन आले तयाप्रती |
शेगांवास गुरुमूर्ति | ही कथा पंचमांत ||
कथा चतुर्थाध्यायाठायीं | येणें रीतीं असे पाही |
जानकीरामें दिला नाहीं | विस्तव चिलमीकारणें ||
किडे पडले चिंचवण्यांत | अन्न गेलें वायां सत्य |
सोनारानें जोडून हात | केली विनंती समर्थांला ||
त्याचा अपराध क्षमा केला | पूर्ववत् केले चिंचवण्याला |
जानकीराम भक्त झाला | ते दिवसापासून ||
होते दोन कान्होले | उतरंडीसी ठेविलेले |
तेच समर्थें मागितले | खाया चंदू मुकिंदासी ||
चिंचोलीच्या माधवाला | यमलोक दावून मुक्त केला |
शिष्याहातें करविला | थाट वसंतपूजेचा ||
कथा तृतीयाध्यायाला | गोसाव्यानें नवस केला |
गांजाचा श्रीसमर्थाला | पाजण्याचा विबुध हो ||
त्याची इच्छा पुरविली | प्रथा गांजाची पडली |
तेथपासोनी भली | शेगांवचे मठांत ||
जानराव देशमुखाचें | गंडांतर टाळिलें साचें |
देऊन तीर्थ पायांचें | आपुलें तें स्वामींनीं ||
मृत्यूचे ते प्रकार | तेथें कथिले सविस्तर |
तुकारामासी दिला मार | ढोंग करितो म्हणोनी ||