
कथा आहे अष्टमांत | दुफळी पाटील देशमुखांत |
अर्ज दिधला सरकारांत | महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ||
खंडूवरी बालंट आलें | तें समर्थांनीं नासिलें |
निर्दोष सुटते झाले | खंडू पाटील खटल्यांतून ||
तेलंगी ब्राह्मणाला | वेद म्हणून दाखविला |
आपण कोण हा कळविला | सहज लीलेनें समाचार ||
कृष्णाजीच्या मळ्याशीं | महाराज राहिले छपरासी |
मंदिराच्या सान्निध्यासी | चंद्रमौळी हराच्या ||
ब्रह्मगिरी गोसाव्याला | अभिमानविरहित केला |
"नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला | रहस्यासह सांगून ||
जळत्या पलंगाच्यावर | महाराज बसते झाले स्थिर |
न जाळे वैश्वानर | केव्हांही खर्या संताला ||